bank strike
sakal
जळगाव: पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याची जुनी प्रलंबित मागणी मान्य व्हावी, यासाठी आज युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने संपाची हाक दिली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील बँक कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी झाले होते. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमधून दिवसभरातील सर्व व्यवहार थांबल्याने साधारण ६० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते.