तिरुअनंतपुरम- परदेशात काम करणाऱ्या पत्नीच्या पैशावर आरामदायी जगण्याची सवय लागलेल्या पतीने लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी बँकेतून १५ लाख रुपये लुटले. या लुटीनंतर तो मोटारसायकलवर पळून गेला. .तीन दिवस तो पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर अखेर त्याला पकडण्यात यश आले.एर्नाकुलम जिल्ह्यातील अंकामली येथे ही घटना नुकतीच घडली. फेडरल बँकेच्या पोट्टा येथील शाखेत ही चोरी झाली. .दुपारी सव्वादोनला बँकेचे कर्मचारी जेवत असताना रिजो अँटोनी हा बँकेत घुसला. त्याने कर्मचाऱ्यांना चाकू दाखवून धमकावले. रोखापालाच्या कक्षातून १५ लाख रुपयांचा बंडल उचलून पलायन केले.पोलिस तीन दिवस त्याचा शोध घेत होते. .अखेर सीसीटीव्हीच्या मदतीने ते अँटोनीच्या घरी पोहोचले. तेथून पोलिसांनी दहा लाख रुपये जप्त केले. पत्नी परदेशात परिचारिका म्हणून काम करत आहे आणि घरी पैसे पाठविते, असे सांगत त्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. ते परत करण्यासाठी त्याने बँकेत चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. बँकेत ४७ लाखांपेक्षा जास्त रोकड असताना त्याने केवळ १५ लाख रुपये घेतले, असे पोलिस म्हणाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.