Diwali 2023 : सणासुदीत घ्या काळजी; भेसळयुक्त मिठाईपासून सावधान

Milk Adulteration Crime Fake Sweet
Milk Adulteration Crime Fake Sweetesakal
Updated on

Diwali 2023 : दसरा-दिवाळी या ऐन सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात गोडधोड पदार्थांची मागणी वाढते. या मागणीचा विचार करता मोठ्या प्रमाणात मिठाई बनवत असताना त्यात अनेक वेळा भेसळयुक्त खवा वापरून पेढा, बर्फी, गुलाबजाम यांसारखे मिठाईचे प्रकार बनविले जाण्याची शक्यता असते.(Be careful during festive season for adulterated sweets dhule news)

या भेसळयुक्त मिठाईपासून ग्राहकांनी सावधान राहत असतानाच अन्न व औषध प्रशासन विभागानेदेखील या भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई करण्याची गरज निर्माण होते आहे.

दिवाळीचा सण आला की प्रामुख्याने खाद्यपदार्थ, मिठाई यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. ही मिठाई बनविण्यासाठी प्रामुख्याने खवा मोठ्या प्रमाणात लागतो. यातून खव्यात भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात या काळात वाढते. मिठाई तयार करण्यासाठी खवा लागतो.

म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण जास्त असल्याने हा खवा प्रामुख्याने म्हशीच्या दुधापासून तयार केला जातो. जाणकारांच्या मते म्हशीच्या एक लिटर शुद्ध दुधापासून साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम खवा तयार होतो. या आकडेवारीचा विचार करता प्रत्येक मिठाईच्या दुकानासाठी किमान २०० ते ३०० लिटर दुधाची आवश्यकता आहे.

दूध आणि मिठाईचे व्यस्त प्रमाण

केवळ साक्री शहरातील मिठाईच्या दुकानांची संख्या लक्षात घेता शहरातच खवा बनविण्यासाठी दोन ते तीन हजार लिटर दुधाची आवश्यकता आहे. तालुक्यातील मिठाई दुकानांची संख्या गृहीत धरली तर हा आकडा खूप मोठा होतो.

Milk Adulteration Crime Fake Sweet
Diwali 2023 : भारतातल्या या गावात दिवाळी दिवशी व्यक्त केला जातो शोक, पण का?

याशिवाय प्रत्येक नागरिकासाठी दररोज लागणारी दुधाची गरज पाहिली तर इतक्या मोठ्या प्रमाणातील दूध हे साक्री शहर अथवा तालुक्यातून उपलब्ध होते का, तालुक्यातील अनेक दूध उत्पादक संस्थांची दूध संकलनाची आकडेवारी लक्षात घेता सरासरी आठ ते दहा हजार लिटर दुधाचे संकलन होते. मग इतक्या मोठ्या प्रमाणात खवा बनविण्यासाठी दूध नेमके येते कुठून हे गांभीर्याने तपासणे गरजेचे आहे.

दोषींवर कारवाई हवी

खव्यासोबतच पनीर, तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचीदेखील वाढती मागणी लक्षात घेता त्यातदेखील भेसळ होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्वांचा विचार केला तर सण-उत्सव काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेऊन निश्चितपणे भेसळयुक्त पदार्थ ग्राहकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

अशा वेळी अन्न व औषध प्रशासन विभागासोबतच स्थानिक प्रशासनाने या गंभीर विषयात लक्ष घालून केवळ तपासणीची औपचारिकता न करता सखोल तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे. तसेच भरारी पथक अथवा अचानक तपासणी करून ही भेसळ रोखण्याची गरज आहे.

Milk Adulteration Crime Fake Sweet
Diwali 2023: दिवाळीसाठी बनवा सुक्या खोबऱ्याची खुशखुशीत करंजी, ही घ्या सोपी रेसिपी

खाद्यपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे वेळोवेळी तपासणी करण्यात येते. आतादेखील साक्री शहरासह पिंपळनेर येथे विभागातर्फे तपासणी करत सहा ठिकाणचे मिठाईचे नमुने घेण्यात आले आहेत.

''खाद्यपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी विभागातर्फे यापुढेदेखील कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनीदेखील याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधावा.''-किशोर बाविस्कर, अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळेे

Milk Adulteration Crime Fake Sweet
Diwali 2023 : धुळ्यातील बाजारपेठ गर्दीने फुलली; रेडीमेड फराळाकडे अधिक कल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com