Bhusawal Police
sakal
भुसावळ: शहरातील बडी खानका, मुस्लिम कॉलनी परिसरात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीच्या शोधार्थ भुसावळात आलेल्या मध्य प्रदेशातील पोलिसांवर संशयित आरोपीसह नातेवाईकांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना गुरुवारी (ता.१५) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात १२ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.