जळगाव- भुसावळ रेल्वे मंडळाने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये माल वाहतूक, प्रवासी वाहतूक सेवा आणि इतर उत्पन्न मिळून १६२५ कोटी ४६ लाख रेल्वे महसूल म्हणून मिळवून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रवाशांना सुविधा पुरविण्यासोबतच रेल्वे महसुलामध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. मंडळ रेल प्रबंधक इती पांडे यांच्या नेतृत्वात भुसावळ रेल्वे मंडळाने ही कामगिरी केली आहे.