भुसावळ- शहरातील खडका रस्त्यालगतच्या ग्रीन पार्कसमोरील गुंजाळ कॉलनीतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बंद घराला मंगळवारी (ता. १७) सकाळी अकराला अचानक आग लागली. आग लागताच अवघ्या १० ते १५ मिनिटात अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले.