Bhusawal
sakal
भुसावळ: शहरातील विकासकामांबाबत प्रभाग क्रमांक तीन हा पूर्णपणे मागे पडलेला भाग आहे. इतर प्रभागांच्या तुलनेत येथे मूलभूत नागरी सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. वीज, रस्ते, गटारी, सार्वजनिक स्वच्छतागृह यांसारख्या प्राथमिक गरजा पूर्ण न झाल्याने येथील नागरिक हैराण झालेले आहेत. याशिवाय ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या उदासीन कारभाराबाबत येथील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.