भुसावळ- जास्तीचे पैसे घेऊन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास रेल्वे पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता. २०) करण्यात आली. येथील रेल्वेस्थानकात रेल्वे सुरक्षा बलाच्या (आररपीएफ) गुप्त वार्ता विभागाच्या पथकाला रेल्वेच्या आरक्षण तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने उपनिरीक्षक सुदामा यादव, नीलेश अधवल, सीआयबी/बीएसएल विलास बोरोले यांच्या पथकाने स्थानकावरील साऊथ साइड रेल्वे आरक्षण केंद्रावर छापा टाकला.