लग्नपत्रिकेत दिले महापुरूषांना स्थान!

सुनील खरे
शनिवार, 28 एप्रिल 2018

विखरणी (नाशिक) : महाभारतात इंटरनेट शोध, प्लास्टिक सर्जरीचा शोध भारतात लागला अशा काही वक्तव्यांमुळे सोशल मिडियावर सत्ता रूढ पक्षाची जमके खिल्ली उडवली जात असताना, विवाह पत्रिकेतून कर्मकांड झुगारून समता प्रस्थापित करणाऱ्या महापुरुषांचे फोटो निमंत्रणपत्रिकेत लावले जात आहेत. अशीच एक विवाह पत्रिका सध्या नाशिक जिल्ह्यासह नगर जिल्ह्यात एक चर्चेचा विषय बनली आहे.

सध्या एक पद्धत रूढ झाली आहे, पत्रिकेत गावातील प्रतिष्ठीत लोकांची तसेच लोकप्रतिनीधींचे नावे यानेच सर्व पत्रिका भरून जाते मात्र सध्या एक अशी पत्रिका चर्चेचा विषय बनली आहे की, या पत्रिकेमध्ये ना कुण्या पुढाऱ्याचे नावे आहे, ना कुण्या ग्रामस्थांचे नावे आहे. सर्व पत्रिका महापुरुषांच्या विज्ञानवादी संदेशानी परिपूर्ण भरली आहे.

विविध महापुरूषांचे विचार, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, करा वृक्ष संवर्धन होईल पर्यावरण रक्षण असे नारे या पत्रिकेतून दिले आहेत. तसेच अंधश्रद्धा झुगारून समता प्रस्थापित करणाऱ्या गौतम बुद्ध, संत तुकाराम, संत सावता माळी, संत गाडगेबाबा, संत रविदास, महात्मा ज्योतीराव फुले, माता जिजाऊ, सावित्री बाई फुले, अहिल्याबाई होळकर, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आण्णाभाऊ साठे, संत पेरियार स्वामी इत्यादी महा पुरुषांच्या प्रतिमा पत्रिकेच्या दर्शनी भागात लावून समतेचा व विज्ञान वादाचा संदेश ह्या पत्रिकेतून दिला आहे. सोशल मिडिया वर सुद्धा या विशेष लग्न पत्रिकेचे कौतुक होत आहे.

Web Title: big personalities in marriage invitation card