जळगाव- शहरासह मालेगाव येथून दुचाकींची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना येथील एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी चौकशीत चार दुचाकी काढून दिल्या. एक संशयित मालेगाव येथील प्राणघातक हल्ल्यातील फरारी असल्याचे समोर आले. .जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रविवारी (ता. १६) एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकाला हद्दीत गस्त घालताना मुबीन शाह शकील शाह (वय २०), दानिश शाह जहीर शाह (२०, दोन्ही रा. मालेगाव) व अमीर ऊर्फ अमिन शाह जहून शाह (२२, रा. शाहूनगर, जळगाव) हे संशयास्पद हालचाली करताना आढळले..शिवाय पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असताना, पथकाने त्यांच्यावर झडप घालत ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दुचाकी चेारीची कबुली दिली. त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या. त्या दुचाकी जळगाव शहर, एमआयडीसी व मालेगावातून चोरल्याचे चोरट्यांनी कबूल केले. दरम्यान, संशयित मुबीन शाह, दानिश शाह व अमीर ऊर्फ अमिन शाह यांच्यावर मालेगावातील आझादनगर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यापासून तो फरारी होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.