Biogas Project News : बायोगॅस प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर; 30 TDP क्षमतेचा प्रकल्प

Biogas Project News
Biogas Project News esakal

Dhule News : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत समाविष्ट कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीच्या प्रकल्पाचे काम महापालिकेतर्फे सुरू आहे. सद्यःस्थितीत प्रकल्पांतर्गत टाक्यांचे बांधकाम सुरू आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून प्रारंभी मार्च २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण करू, असा विश्‍वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून यापूर्वी झाला होता. प्रत्यक्षात अद्याप बरेच काम बाकी आहे.(Biogas project work in progress Proceedings on behalf of Municipal Corporation Construction of tanks starte Project with 30 TDP capacity Dhule News)

महापालिकेच्या वरखेडी रोडवरील जागेवर ३० टीपीडी क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प मंजूर होता. विविध कारणांनी या कामाला मात्र ब्रेक लागला होता. दरम्यान, २७ डिसेंबर २०२२ ला स्थायी समितीने प्रकल्पाला मंजुरी दिली.

त्यानंतर कार्यादेश व इतर कार्यवाही झाल्यानंतर काम सुरू झाले. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही कार्यवाही मनपा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली होती. त्यामुळे मार्च २०२३ अखेर प्रकल्प पूर्ण करू, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.

मात्र, ही डेटलाइन उलटून आता अडीच-तीन महिने होतील. मात्र, अद्यापही काम प्रगतिपथावर आहे. सद्यःस्थितीत प्रकल्पांतर्गत दहा-दहा टनांच्या तीन टाक्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अद्याप बराच अवधी लागण्याची शक्यता आहे.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत अत्यंत महत्त्वाच्या या प्रकल्पाकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रकल्प उभारून तो वर्षभर चालविणे व त्यानंतर पाच वर्षांपर्यंत देखभाल-दुरुस्ती संबंधित प्रकल्पाचे काम करणारी संस्था/कंपनी करणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Biogas Project News
Dhule News : जिल्ह्यात 205 जागांवर भरती; 17 जुलैला अर्जासाठी अंतिम मुदत

ओल्या कचऱ्याची गरज

एकूण ११ कोटी ८४ लाख ८८ हजार ८५७ रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी दररोज ३० टन ओल्या कचऱ्याची गरज भासणार आहे. महापालिका क्षेत्रातून दररोज किती ओला कचरा उपलब्ध होतो यावर या प्रकल्पाचे काम चालेल.

कचरा उपलब्धतेच्या अनुषंगाने दहा-दहा टनांच्या तीन टाक्या बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे किमान दहा टन कचरा उपलब्ध झाला तरी एका टाकीच्या माध्यमातून बायोगॅस निर्मिती करता येईल असा उद्देश आहे. बायोगॅस प्रकल्पासाठी ओल्या कचऱ्याची गरज पाहता महापालिकेकडून ओला-सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाकडेही आत्तापासूनच लक्ष देण्याची गरज आहे.

सद्यःस्थिती पाहता ओला, सुका कचरा वर्गीकरणाचे कामच होत नाही अशी स्थिती आहे. कचरा संकलन करताना ओला, सुका कचरा घेतला जात नाही. सर्व कचरा एकत्रच केला जातो. कचरा वर्गीकरणाच्या जनजागृतीबाबत महापालिका व कचरा संकलन करणारी स्वयंभू ट्रान्स्पोर्ट कंपनीदेखील कमी पडल्याचे चित्र पाहायला मिळते. नागरिकांना कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले जात असले तरी तशी व्यवस्थाच उभी केल्याचे दिसत नाही.

Biogas Project News
Nashik News : शहरात Triple Seat स्वार सुसाट; वाहतूक शाखेचा अघोषित परवाना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com