
महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील संभावित बर्ड फ्लू आजाराबाबत नंदुरबार जिल्हयात सतर्क राहणेबाबत सुचना दिल्या.
शहादा : आपल्याकडे मांसाहार शिजवून खाल्ला जात असल्याने जिल्हयात सध्या बर्ड फ्लू किंवा तत्सम कोणत्याही प्रकारचा आजाराचा धोका नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोंबडयांचे मांस व अंडी सेवन करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केले.
श्री.पाटील यांनी जिल्हयातील व्यावसायिक पोल्ट्री फार्म मालक तसेच परिसरातील कुक्कुट पालन करणारे शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष भेट देवून चर्चा केली जात आहेत. या उपक्रम अंतर्गत अनुषंगाने नवापुर तालुक्याची ओळख असलेला कुक्कुट पालन व अंडी उत्पादन व्यवसायीकांची भेट घेऊन त्यांच्याशीही सखोल चर्चा केली. यावेळी श्री पाटील यांच्या समवेत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.उमेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.के.टी.पाटील , डॉ.अशोक वळवी , पशुधन विकास अधिकारी ( वि . ) , पंचायत समिती नवापुर आदी उपस्थित होते .
सतर्क रहा !
मार्गदर्शन करतांना त्यांनी व्यवसायिकांच्या समस्या जाणुन घेतल्या. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील संभावित बर्ड फ्लू आजाराबाबत नंदुरबार जिल्हयात सतर्क राहणेबाबत सुचना दिल्या. तसेच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना बायो सिक्युरिटीच्या माध्यमातून तंतोतंत पाळणे बाबत मार्गदर्शन केले.
मास, अंडी शिजवून खात असल्याने धोका नाही
तसेच नागरिकांनी घाबरुन न जाता नियमित पणे कोंबडयांचे मांस व अंडी सेवन करावे . नंदुरबार जिल्हयात सद्यस्थितीत बर्ड फ्लू किंवा तत्सम कुठलाही आजार नसल्याने भिती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. असा विश्वास जनतेला दिला आहे . हा विषाणू मांस व अंडी 70 अंश सेल्सियस ला 3 मिनीटांपर्यंत उकळल्यास नाहिसा होतो.
संपादन- भूषण श्रीखंडे