Dhule News : सावरकर स्मारकासाठी आता 50 लाख; उशिरा शहाणपण!

BJP approves resolution to allocate 50 lakhs for memorial of swatantryaveer savarkar dhule news
BJP approves resolution to allocate 50 lakhs for memorial of swatantryaveer savarkar dhule newsesakal

Dhule News : शहराच्या देवपूर भागातील स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या स्मारकासाठी ५० लाखांची तरतूद करण्याचा ठराव सोमवारी (ता. १२) महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपकडून मंजूर करण्यात आला. (BJP approves resolution to allocate 50 lakhs for memorial of swatantryaveer savarkar dhule news)

विशेष म्हणजे या स्मारकासाठी इतर कुणाचाही निधी वापरू नये, एनओसी देऊ नये, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या गेल्या. काही दिवसांपूर्वी स्मारकाच्या दुरवस्थेप्रश्‍नी मनपातील सत्ताधारी भाजपवर टीका झाल्यानंतर धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारूक शाह यांनी या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी २० लाखांचा निधी जाहीर केला होता.

महापालिकेच्या महासभेपुढे महापौरांच्या पत्रानुसार विकास शुल्क निधीतून शहरातील अत्यावश्‍यक व महत्त्वाची कामे निश्‍चित करण्याचा विषय होता. यावर महापौर प्रतिभा चौधरी यांनी काही कामे निश्‍चित केल्याचे सभेत जाहीर केले. यात देवपूर भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक तसेच इतर कामांचा समावेश करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

BJP approves resolution to allocate 50 lakhs for memorial of swatantryaveer savarkar dhule news
Nashik News : डिजिटल व्यवहारांमुळे एटीएम ओस; 5 रुपयांसाठीही नागरिक करताय फोन पे!

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केल्याचे महापौर श्रीमती चौधरी यांनी सांगितले. या विषयावर बोलताना नगरसेवक शीतल नवले यांनी इतर कुठलाही निधी यासाठी वापरू नये, अशी मागणी केली. प्रदीप कर्पे यांनी आपण महापौर असताना ३० लाखांची तरतूद केल्याचे तसेच स्मारकाचा आराखडाही तयार केल्याचे सांगितले.

आमदारांवर कुरघोडी

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या दुरवस्थेप्रश्‍नी शिवसेना (उबाठा) पक्षाने भीक मांगो आंदोलन करून मनपातील सत्ताधारी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर शहराचे एमआयएमचे आमदार शाह यांनी स्मारकासाठी २० लाख रुपयांचा निधी जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आता ५० लाखांची तरतूद करणे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया उमटली.

पर्यटनस्थळाचा दर्जा

दरम्यान, सभेपुढे माजी उपमहापौर नागसेन बोरसे यांच्या पत्रानुसार शहराच्या देवपूर भागातील श्री स्वामिनारायण मंदिर स्थळास पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याबाबत शासनाकडे शिफारस करण्याचा विषय मांडला होता. शहरातील इतर धार्मिक स्थळांचाही यात समावेश करून विषय मंजूर केल्याचे महापौर श्रीमती चौधरी यांनी जाहीर केले.

BJP approves resolution to allocate 50 lakhs for memorial of swatantryaveer savarkar dhule news
Nashik News : घरबसल्या करता येणार शासनाच्या दाखला मागणीचा प्रस्ताव सादर ! या संकेतस्थळावर करा अर्ज

एक विषय नामंजूर, एक तहकूब

नगरसेविका मदिना समशेर पिंजारी यांच्या पत्रानुसार प्रभाग क्रमांक १९ मध्ये सहा ठिकाणी स्वखर्चाने स्वागत कमान बांधण्यासाठी ना हरकत दाखला देण्याच्या विषयावर स्वयंस्पष्ट अहवाल नसल्याचे कारण देत विषय नामंजूर करण्यात आला, तर जिल्हास्तरीय समितीने मनपा क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांतर्गत प्रस्तावित कामांसाठी केलेल्या शिफारशीनुसार धोरण निश्‍चितीचा विषय होता.

या विषयावर मनपाच्या जागा बळकावल्या जातात, असा सूर उमटला. शिवाय देखभाल-दुरुस्तीसाठी मनपाची आर्थिक स्थिती नाही, निकष व अटी-शर्तींचा उल्लेख नसल्याचे कारण देत विषय तहकूब करण्यात आला.

डॉ. पाटलांसाठी शिफारस...

मानधन तत्त्वावरील वैद्यकीय अधिकारी (आयुष) डॉ. योगेश शालिग्राम पाटील यांना मनपातील वैद्यकीय अधिकारी या मंजूर व रिक्त पदावर सामावून घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यास महासभेने मंजुरी दिली. विशेष म्हणजे डॉ. पाटील यांचे वय व अर्हता शिथिल करण्याबाबतही शिफारस करण्यात आली.

BJP approves resolution to allocate 50 lakhs for memorial of swatantryaveer savarkar dhule news
Nandurbar News : मका खरेदीसाठी शेतकऱ्यांना 15 जूनपर्यंत नोंदणीचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com