जळगाव जिल्हा परिषदेवर पुन्हा भाजपची सत्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

भाजप कडून अध्यक्ष पदासाठी एनपूर- खिरवड गटातील रंजना प्रल्हाद पाटील यांनी अर्ज सादर केला . तर उपाध्यक्ष पदाराठी नशिराबाद- भादली गटातील लालचंद पाटील यांचा अर्ज सादर करण्यात आला होता. महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी रेखा राजपूत आणि उपाध्यक्ष पदासाठी जयश्री पाटील यांचा अर्ज सादर केला होता. सभागृहात झालेल्या मतदान प्रक्रियेत रंजना प्रल्हाद पाटील या 34-31 अशा मतांनी विजयी झाल्या.

जळगाव : भाजपकडून जिल्हा अध्यक्षपदासाठी रावेरच्या रंजना प्रल्हाद पाटील यांची 34-31 अशा मतांनी निवड झाली. तर उपाध्यक्ष पदी लालचंद पाटील यांची निवड झाली.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आज निवड प्रक्रिया राबविण्यात आली. भाजपच्या हातातील सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयन्त अपूर्ण पडले. सदस्य फोडाफोडीच्या राजकारणात भाजपने काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे एक सदस्य फोडून जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता स्थापन केली. 

जि. प. अध्यक्ष पदी रंजना पाटील यांची निवड

भाजप कडून अध्यक्ष पदासाठी एनपूर- खिरवड गटातील रंजना प्रल्हाद पाटील यांनी अर्ज सादर केला . तर उपाध्यक्ष पदाराठी नशिराबाद- भादली गटातील लालचंद पाटील यांचा अर्ज सादर करण्यात आला होता. महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी रेखा राजपूत आणि उपाध्यक्ष पदासाठी जयश्री पाटील यांचा अर्ज सादर केला होता. सभागृहात झालेल्या मतदान प्रक्रियेत रंजना प्रल्हाद पाटील या 34-31 अशा मतांनी विजयी झाल्या.

अन काँग्रेसच्या सदस्याला आणले पकडून...
 जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवड होत असून भाजपचे सर्व सदस्य ट्रॅव्हल मधून येऊन शक्ती प्रदर्शन केले; यात काँग्रेसचे सदस्य दिलीप पाटील यांना भाजपच्या सदस्यांनी पकडून आणले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP wins again in Jalgaon Zilla Parishad election jalgaon marathi news