जळगाव- शहरातील रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिस चौकीच्या दारातच उभ्या एका कारमधून ‘बीप-बीप’चा आवाज येत असल्याने रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांची एकच धावपळ झाली. बाँबशोधक पथकाने तपासणी केल्यावर हा आवाज ‘इंडिकेटर’चा असल्याचे निष्पन्न झाले अन् पोलिसांसह प्रवासी आणि बघ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.