बीएसएनएल’ने वाड्या-पाड्यांसह जिल्हाभर विनले 3G चे जाळे!  

संतोष विंचू
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

येवला - शासकीय काम सहा महिने थांब..अशी ग्रामीण भागात म्हण आहे.असाच प्रत्यय सरकारच्या बीएसएनएल या दूरसंचार कंपनीबाबत मागील काही वर्ष येत होता.मात्र मागील महिनाभरात कात टाकल्याप्रमाणे ‘बीएसएनएल’ने भरारी घेतली असून यंत्रणा,टॅावर,ओफसीचे जाळे वेगाने विणले आहे.याचा परिपाक म्हणजे जिल्ह्याचा ९० टक्के भागात बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध आहे.विशेष म्हणजे वाड्या-पाड्यांसह सुमारे ७५ टक्के जिल्हा थ्री जी  नेटवर्कमुळे नेटकरी झाला आहे.

येवला - शासकीय काम सहा महिने थांब..अशी ग्रामीण भागात म्हण आहे.असाच प्रत्यय सरकारच्या बीएसएनएल या दूरसंचार कंपनीबाबत मागील काही वर्ष येत होता.मात्र मागील महिनाभरात कात टाकल्याप्रमाणे ‘बीएसएनएल’ने भरारी घेतली असून यंत्रणा,टॅावर,ओफसीचे जाळे वेगाने विणले आहे.याचा परिपाक म्हणजे जिल्ह्याचा ९० टक्के भागात बीएसएनएलचे नेटवर्क उपलब्ध आहे.विशेष म्हणजे वाड्या-पाड्यांसह सुमारे ७५ टक्के जिल्हा थ्री जी  नेटवर्कमुळे नेटकरी झाला आहे.

खाजगी दुससंचार कंपन्या झटपट योजना देऊन ग्राहक खेचत असतांना बीएसएनएल का धीम्या गतीने सुविधा देतेय हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न होता.मात्र मोबाईल,लन्डलाईन व ब्रॉडबंन्ड सेवेत अनेक योजना जाहीर करून सरकारी असूनही बीएसएनएलने स्पर्धेत स्थान टिकवले आहे.जीवोसह खाजगी कंपन्यांनी फोर जी नेटवर्क देऊन धुमाकूळ घातल्यानंतर बीएसएनएलची ग्रामीण भागातील टूजी सेवा अनेकांना खटकत होती.मात्र ग्राहकांच्या अपेक्षेला अखेर फळ मिळाले आहे.शहरासह ग्रामीण भागात टॅावरची संख्या दुप्पटीने वाढवत तुरळक भाग वगळता सर्वत्र थ्री जी  सेवा उपलब्ध होत आहे.याव्यतिरिक्त १५ ते २० टक्के भागात टू जी सेवा सुरु आहे.ज्या परिसरात नेटवर्क उपलब्ध होत नव्हते तेथेही टॅावर दिल्याने खेड्या-पाड्यावर नेटवर्क मिळणारी बीएसएनएल एकमेव कंपनी झाली आहे.   

सटाणा,देवळा,लोहणेर,ताराहाबाद,नामपूर येथे नुकतीच थ्रीजी सेवा सुरु झाली तर डांगसौंदाणे,मुल्हेर,जायखेडा,राजापूर येथे सेवा सुरु होत आहे.येवल्यातही पाटोदा,नगरसूल,मुखेड,जळगाव नेऊरलाही थ्री जीने सेवेने ग्राहकांना वेगळा आनंद मिळत आहे.खासदार हरिचंद चव्हाणांच्या आग्रहाने पेठ,करंजाळी,हरसूलला थ्री जी मिळत आहे.

मुंबई ते धुळे फुल्ल रेंज
मुंबई आग्रा महामार्ग पूर्णतः थ्री जीच्या कक्षेत आला आहे.यामुळे मुम्बई ते नाशिक आणि पुढे नाशिक ते धुळ्यापर्यत बीएसएनएलची थ्रीजी सेवा ग्राहकांना मिळत आहे.याशिवाय मालेगाव,सिन्नर,औरंगाबादकडे जाणारे महामार्गही थ्रीजीत आले आहेत.

थ्रीजी नव्हे साडेतीन जी...
फेज ८ मध्ये बीएसएनएलने अनेक दूरगामी कामे हाती घेतली आहेत.थ्रीजीचे जिल्ह्यात २२६ टॅावर होते हीच संख्या आता ५५२ झाली आहेत.विशेष म्हणजे बीएसएनएलची जुनी यंत्रणा बदलवत नवीन नोकियाची अत्याधुनिक यंत्रणा अनेक उपकेंद्रात कार्यान्वित केली आहे.हि यंत्रणा थ्रीजीची असली तरी तीची क्षमता ३.५ जीची असल्याने अधिक वेगवान स्पीड मिळू शकत आहे.                   

थ्रीजीचे एकूण उभे असलेले टॅावर - ५५२
टूजीचे एकूण उभे असलेले टॅावर - ४६२  
थ्रीजीचे नव्याने होत असलेले टॅावर - ७७
ओएफसीद्वारे ब्रॉडबंड जोडणी दिलेल्या ग्रामपंचायती - २२०
 ग्रामपंचायतीना ब्रॉडबंड जोडणी देण्याचे नियोजन - ६०९

“बीएसएनएलने जिल्ह्यात नव्याने टॅावर उभे करण्यासह यंत्रणा अद्ययावत केल्याने इंटरनेट सेवेत अमुलाग्र बदल झाला आहे.येत्या महिन्यात सुरु असलेले सर्वच कामे पूर्ण झाल्यावर सर्वत्र वेग धरलेला असेल.आदिवासी व दुर्गम भागासह ९० टक्के जिल्हयात नेटवर्क उपलब्ध झाले आहे.ग्रामपंचायत,आरोग्य केंद्र,शाळांना ब्रॉडबंड सुविधा दिल्या जात आहेत.अजूनही वेगाने कामे करण्याचे यापुढील काळात नियोजन आहे.”
- नितीन महाजन, महाप्रबंधक,नाशिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL launches network with 3G network