निंभोरा बुद्रुक (ता. रावेर): येथील माजी ग्रामपंचायत सदस्या हाजराबाई हुसेन तडवी (वय ६०) यांनी त्यांचे पती, न्यू इंग्लिश स्कूलचे निवृत्त शिपाई हुसेन रसूल तडवी (वय ६५) यांचा कुऱ्हाडीने खून केला. ही घटना शनिवारी (ता. ३०) रात्री दहाच्या सुमारास गणेश कॉलनीत घडली.