दोंडाईचा- येथील कॉलनी परिसरात घरफोडी करणाऱ्या तीन संशयितांना पोलिसांनी पकडले. दरम्यान, पोलिसांनी तपासकामी चोरट्यांची शहरातून वरात काढली. सोने-चांदीचे दागिने, रोकड, असा ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भुरट्या चोरट्यांची चांगलीच धडकी भरली आहे.