Dhule News : धुळे तालुक्यातील 3 रस्त्यांचे भाग्य उजळणार; 30 कोटींचा निधी मंजूर

doc. subhash bhamare
doc. subhash bhamareesakal
Updated on

धुळे : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. त्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पाठपुराव्यातून धुळे तालुक्यातील संबंधित रस्त्यांसाठी ३० कोटींचा निधी मंजुरीतून मिळविला आहे. (by Gram Sadak Yojana for road construction 30 crore fund approved dhule news)

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निमगूळ ते बाबरे (११.५ किलोमीटर), नंदाळे खुर्द ते भिरडाणे ते चिंचखेडा-बाबरे (२०.४२ किलोमीटर) आणि चिंचवार ते सैताळे (३.४५ किलोमीटर) या तीन रस्त्यांची कामे होतील.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

doc. subhash bhamare
National Voter's Day 2023: गरुडा App बनले यंत्रणेसाठी तारणहार! ऑनलाइन प्रणालीत रंगीत मतदारकार्ड

त्यासाठी खासदारांच्या पाठपुराव्याअंती राज्यातील भाजप युती सरकारने ३० कोटींचा निधी दिला आहे. धुळे तालुक्यातील विविध गावांना महामार्गाशी थेट जोडणारे रस्ते चांगले, दर्जेदार तयार व्हावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे खासदार डॉ. भामरे यांनी पाठपुरावा केला.

doc. subhash bhamare
Nashik News : सारुळच्या खाणपट्टाप्रकरणी शेतकऱ्यांचे मुंबईत उपोषण! अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dhule Solapur Road Accident Police Officer Killed After Car Driver Fails To Notice Flyover And Service Road Construction
road work
Dhule cyclists complete Pandharpur cycle wari
Alandi Flood
Marathi News Esakal
www.esakal.com