Vidhan Sabha 2019 : प्रचाराच्या खर्चाचा हिशोब न दिल्याने येवल्यात उमेदवारावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 October 2019

Vidhan Sabha 2019 : येवला : निवडणूक रिंगणातील उमेदवाराला रोजच्या खर्चाचा हिशोब वेळेत सादर करावा लागतो. नियमाने वेळेत खर्च सादर केला नाही म्हणून येवला लासलगाव मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन अलगट याच्यावर भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा व भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अलगट बहुजन आघाडीचे उमेदवार असून निवडणूक काळात प्रचार व इतर खर्चाचा हिशोब ठेवणे व तो निवडणूक शाखेमध्ये देणे बंधनकारक आहे. असे असताना त्‍यांनी सोमवारपर्यंत कोणता हिशोब सादर केला नसल्याने निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार भास्कर हंडोरे यांनी येवला शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री फिर्याद दिली.

 या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अलगट यांच्यावर भा दं वि कलम 171 ( 1 ) व भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 77 व 123 (6) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस उपनिरीक्षक मनोहर मोरे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case File against candidate in Yewala for Not accounting for campaign costs