Latest Marathi News | धनादेश अनादरप्रकरणी गोरख पाटील याला कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Check News

Dhule News : धनादेश अनादरप्रकरणी गोरख पाटील याला कारावास

धुळे : धनादेश अनादर प्रकरणी जिल्हा न्यायालयाने नावरी (ता. धुळे) येथील गोरख सीताराम पाटील या संशयितास कैदेची शिक्षा सुनावली.

येथील सीमा निंबा पाटील यांनी पती निंबा झोपा पाटील यांच्या ओळखीचे गोरख सीताराम पाटील यास व्यवसायासाठी ऑक्टोबर २०१७ मध्ये वीस लाख रुपये उसनवार दिले.

तशी लिखापढी झाली व तीन धनादेश गोरख पाटील याने दिले होते. २०१९ मध्ये सीमा पाटील यांनी ते तीन धनादेश वटविण्यासाठी बँकेत जमा केले. (Case of dishonor of cheque Imprisonment of Gorakh Patil Dhule News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik Crime News : अन्नदानाच्या बहाण्याने मंडप डेकोरेटरला गंडविले! भांडी घेऊन संशयित पसार

मात्र, त्यांचा अनादर झाला. त्यामुळे सौ. पाटील यांनी ॲड. दीपक जोशी यांच्यामार्फत संशयित गोरख सीताराम पाटील यास नोटीस दिली व उसनवारीतील वीस लाख रुपयांची मागणी केली.

परंतु, पाटील याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ॲड. पाटील यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात गोरख पाटील याच्याविरुद्ध चलनक्षम पत्रकाचा अनादर कायद्यानुसार दावा दाखल झाला.

सुनावणीअंती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फिर्यादीकडील कागदपत्रे, साक्षीपुरावे व ॲड. जोशी यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत आरोपी गोरख पाटील याने फिर्यादीला ४० लाख रुपये अदा करावे, तसेच या रकमेवर दरसाल दर शेकडा नऊ टक्क्यांनी व्याज द्यावे, असा निकाल देत न्यायालयाने आरोपीस सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच नुकसान भरपाई न दिल्यास पुन्हा चार महिन्यांची कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

हेही वाचा: Jalna News : नवीन धोरणाच्या प्रतीक्षेत वाळूचे लिलाव