esakal | VIDEO :...तर त्याचा अतिरिक्त बोजा सर्वसामान्य नाशिककरांवर नको - छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

chagan bhujbal0.jpg

बससेवेबद्दल सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करावा. बस सेवा टॅक्स नाशिक करांच्या माथी बसणार आहे हा नाशिकरांवर अतिरिक्त टॅक्स बसणार आहे. त्यापेक्षा बस महामंडळला पैसे दिले तर चांगले नाहीतर १०० कोटी भुर्दंड पडेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महामंडळाची योग्य मदत घेण्याची आवश्यकता आहे.

VIDEO :...तर त्याचा अतिरिक्त बोजा सर्वसामान्य नाशिककरांवर नको - छगन भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक मेट्रो, बससेवेला कोणीही विरोध केलेला नाही केवळ राज्यातील इतर शहरातील मेट्रो व बससेवेचा अभ्यास करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कारण जगात कुठेही पब्लिक ट्रान्सपोर्ट फायद्यात नाही तर सर्व तोट्यात आहे. आवश्यकता असेल तर अभ्यास करून निर्णय घ्यावा. मात्र कुठलाही निर्णय घेतांना त्याचा अतिरिक्त बोजा सर्वसामान्य नाशिककरांवर पडायला नको याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन, कौशल्य विकास व उद्योजगता मंत्री ना. छगन भुजबळ यांनी केले. आज नाशिक येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

...नाहीतर १०० कोटी भुर्दंड पडेल
भुजबळ म्हणाले की, बससेवेबद्दल सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करावा. बस सेवा टॅक्स नाशिक करांच्या माथी बसणार आहे हा नाशिकरांवर अतिरिक्त टॅक्स बसणार आहे. त्यापेक्षा बस महामंडळला पैसे दिले तर चांगले नाहीतर १०० कोटी भुर्दंड पडेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे महामंडळाची योग्य मदत घेण्याची आवश्यकता आहे. केवळ कंत्राट काढण्यासाठी प्राधान्य देऊ नये अशी टीका त्यांनी यावेळी केली. मुंबईत पादचाऱ्यासाठी अनेक पादचारी पूल बांधले आहे. मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर होत नाही. यासाठी आपण सुरुवातीलाच विरोध केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

loading image