चाळीसगाव- बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती होण्याच्या उद्देशाने पहिलीच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात ‘चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८’ समाविष्ट करण्यात आला आहे. सात वर्षांपूर्वी तिसरीच्या पर्यावरणशास्त्र पुस्तकात याचा समावेश करण्यात आला होता. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून पहिलीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये देण्यात आला आहे.