चाळीसगाव- शहरातील २२ वर्षीय तरुणीचे सुमारे चार लाख सहा हजारांच्या ऐवजासह अपहरण करण्यात आले. या प्रकरणी येथील पोलिसांत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, एकाला पोलिसांनी अटक केली आहे. .शहरातील एका भागात वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील २२ वर्षीय तरुणीचे सोमवारी (ता. १४) त्याच परिसरात राहणाऱ्या काही जणांनी अपहरण केले. तिला फूस लावून तिच्या घरातील रोकडसह दागिने मिळून सुमारे चार लाख सहा हजारांचा ऐवजही अपहरणकर्ते घेऊन गेले. मुलगी मिळून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. .मात्र, ती मिळून आली नाही. अखेर पोलिसांत माहिती दिली. त्यावरून पोलिसांत हरविल्याची नोंद झाली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी गल्ली व जवळपासच्या भागातील ‘सीसीटीव्ही’चे फुटेज पाहिले असता, तरुणीस संशयित बिलाल शहा लुकमान शहा (रा. दत्त गल्ली, घाट रोड) घेऊन जाताना दिसला. .तरुणीला पळवून घेऊन जाण्यासाठी अमीर ऊर्फ बबडी निसार शेख, छन्नो ऊर्फ सलीम शेख सनम शेख दुचाकीवर येऊन त्यांना मदत करताना दिसून आले, तर नुरा ऊर्फ नुरोद्दीन शेख याच्या मालकीची लाल रंगाची स्विफ्ट गाडी फुटेजमध्ये जाताना दिसली. मुलीच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या नागरिकांकडे विचारणा केली असता, तरुणीस बिलाल शहा पळवून घेऊन गेला व त्यांना घेऊन जाण्यासाठी बबडी शेख, सलीम शेख नुरोद्दीन शेख व नदीम खान ऊर्फ नदीम गोल्डन साबीर खान यांनी मदत केल्याचे समजले. .कुटुंबीयांनी घरात जाऊन कपाट पाहिले असता, अडीच लाख रुपयांची रोकड व एक लाख ५६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, असा सुमारे चार लाख सहा हजार रुपयांचा ऐवज दिसून आला नाही. संशयितांनी संगनमत करून, तरुणीला फूस लावून पैसे व सोन्याचे दागिने घरातून काढून आणण्यासाठी प्रवृत्त केले व तिचे अपहरण केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी बिलाल शहा लुकमान शहा, अमीर ऊर्फ बबडी निसार शेख, छन्नो ऊर्फ सलीम शेख सनम शेख, नुरा ऊर्फ नुरोद्दीन शेख शफरोद्दीन शेख व नदीम खान ऊर्फ नदीम गोल्डन साबीर खान यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.