चाळीसगाव- आर्थिक वर्ष संपत असल्याने थकबाकीदारांविरोधात येथील पालिका प्रशासनाकडून धडक मोहीम राबविली गेली अन् त्यात ३१ मार्चअखेर ८२ टक्के वसुली झाली. पालिकेअंतर्गत शहरात २४ हजार ४७७ करधारक व १८ हजार १६० नळजोडणीधारक आहेत. .एकूण १५ पथके वसुलीसाठी कार्यरत होते. पालिकेला दहा कोटी ९५ लाख ५६ हजार रुपयांचे उद्दिष्ट्य होते, त्यापैकी नऊ कोटी दोन लाख ५१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. म्हणजेच ८२.३१ टक्के वसुली झाल्याने उद्दिष्टे गाठण्यासाठी मोठी कसरत केल्याचे दिसून येत आहे..करवसुली हाच पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. चांगली वसुली झाल्यास नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक बळकट करता येतील व अधिक चांगल्या सुविधा देता येतील. त्यामुळे मालमत्ताधारकांनी नियमित कर भरावा, असे आवाहन पालिकेने केले होते. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यात करधारकांनी घरूनच ऑनलाईन १ कोटी १५ लाख रुपये भरले व पॉश मशीनने म्हणजेच क्यूआर कोडने १ कोटी ५० लाख रुपये भरले..पालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी गृहभेटी देऊन करवसुली मोहिमेला सुरुवात केली होती. सुटीच्या दिवशी म्हणजे गुढीपाडवा व रमजान ईदच्या दिवशीही करवसुलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास १५ करवसुली पथकांची नियुक्ती केली होती. प्रत्येक पथकात पाच व्यक्तींचा समावेश होता..काही करदात्यांना कारवाईबाबत नोटीसाही बजावल्या. त्यात कारवाई होऊ नये, म्हणून नागरिकांनी कर भरला. या पथकात गोपाल शिंदे, दिनेश जाधव, दिपाली गावित, सुनीता कंनोर, राजीव वाघ, प्रशांत ठाकूर, प्रकाश शिंदे, बाळासाहेब दुधभाते, सोनाली आंबेडकर, दीपक देशमुख, अनिल गडे, भूषण लाटे, संजय राजपूत, विजय जाधव, संजय गोयर यांचा व शासकीय मालमत्ता टॉवरसाठी योगेश मांडोळे व प्रकाश शिंदे यांचा समावेश होता..काही पुढाऱ्यांचा हस्तक्षेपपालिका यंत्रणेला दर वर्षी विविध कर गोळा करण्यासाठी कसरत करावी लागते. स्वतःहून करभरणाऱ्या नागरिकांची संख्या अत्यल्प म्हणजे १० ते २० टक्के असल्याचे कर्मचारी सांगतात. पालिकेचे काही प्रमाणपत्र, ना हरकत किंवा इतर काही काम असेल, तर आधी कर भरा, असा आग्रह कर्मचारी संबंधिताना करतात. त्यावेळी काहीजण कर भरतात, तर काहीजण स्थानिक नेत्याचा वशिला लावून हा कर टाळता येतो का, हेही पाहतात. यात ज्या पथकाने जास्त करवसुली केली, त्यांचा सत्कार मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.