चाळीसगाव- येथील ग्रामीण रुग्णालयात वर्षभरात तब्बल एक हजार २३६ महिलांच्या सुरक्षित प्रसूती झाल्या आहेत. राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमधून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. धडगाव (जि. नंदुरबार) रुग्णालयात एक हजार ६५३ प्रसूती झाल्याने प्रथम, तर धाराशीव ग्रामीण रुग्णालयात एक हजार २८८ प्रसूती झाल्याने दुसरा क्रमांक मिळवला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात कुठलेही अतिरिक्त कर्मचारी नसताना प्रसूतीदरम्यान एकाही महिलेचा मृत्यू झालेला नाही. ६१ प्रसूती सिझेरियन पद्धतीने, तर एक हजार १७५ प्रसूती नैसर्गिक पद्धतीने झाल्या आहेत.