चाळीसगाव- राज्यातील बहुतांश आगारांमध्ये नव्या बस दाखल होत असल्याने येथील आगारात कधी नवीन बस येतात, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असताना नुकत्याच पाच नवीन बस दाखल झाल्या. या बसचे लोकार्पण आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, येथील आगाराला आणखी पाच ते सहा नवीन बस मिळणार असल्याचे आगार व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.