अनोळखी...तरीही व्हिडीओ चॅटींग?...

images.jpg
images.jpg

नाशिकः स्मार्टफोनवरील विविध मोबाईल  ॲप्लीकेशनद्वारे अनोळखी व्यक्‍तीसोबत कुठल्याही स्वरूपात खासगी माहिती न शेअर करता संवाद साधण्याचे पर्याय उपलब्ध आहे. सध्या तरूणाईमध्ये या ॲप्सचे भलतेच आकर्षण असल्याचे दिसून येत आहे. 
मात्र या ॲपद्वारे फसवणूकीचा धोका अधिक असल्याने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. सोशल मीडियाच्या अधिकाधिक वापरामुळे तसेच, सततच्या ॲप्लिकेशनमध्ये येणाऱ्या नाविन्यामुळे व्हिडीओ चॅटिंगला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे बघायला मिळत आहे.

तरुणांसोबतच लहान मुलांमध्ये वाढतेय क्रेझ...

देश-विदेशात कितीही दुरवर असलेली व्यक्तीसोबत अगदी समोर बोलतोय अशी व्हिडीओ व्हॉट्‌सअप, फेसबुक यांसारख्या ॲपमध्ये तर व्हिडिओ चॅटिंग तर असतेच. मात्र आता असे ॲप्लिकेशन आहेत ज्यात कुठल्याही प्रकारचे नाव, मेल आयडी, मोबाईल नंबर किंवा कोणत्याही प्रकारचा संदर्भ न देता एखाद्या व्यक्तीसोबत संवाद साधता येऊ शकतो. तरुणांसोबतच लहान मुलेदेखील याकडे आकर्षित होत आहेत. या ॲप्लिकेशनमध्ये असणारे विविध रंगसंगती, स्टिकर्स, फिल्टर्स, इमोजी यांमुळे लहानमुले या ॲप्लिकेशनकडे आकर्षित होतांना बघायला मिळत आहे. 

प्ले स्टोअरवर फ्री व्हिडीओ कॉलिंग प धुमाकूळ

प्ले स्टोअरवर फ्री व्हिडीओ कॉल, स्ट्रेंजर चॅट, चॅट फॉर स्ट्रेंजर, स्ट्रेंजर चॅट ॲप नो लॉगीन, रॅन्डम व्हिडीओ चॅट विद स्ट्रेंजर अशाप्रकारचे ॲप्लिकेशनला इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडीओ चॅट केले जातात. अनोळखी व्यक्तीसोबत ओळख वाढविण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी गैरकृत्यांना देखील हे ॲप्लिकेशनचे वापरकर्ते बळी ठरू शकतात. या ॲप्लिकेशनवर जरी कुठलेही व्यक्‍तीची नोंद नसली तरीही समोरील व्यक्तीला विश्‍वासात घेऊन खाजगी माहितीही मिळवून घेऊन असे ॲप्लिकेशनचा गैरवापर केला जाऊ शकतो, याचा गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. 


खबरदारी आवश्‍यक​
लहान मुले जेव्हा ऑनलाईन येतात तेव्हा त्यांच्याशी व्हिडीओवरील जो व्यक्ती सांगेल. त्या कृती ते सहज करु शकतात. तसेच, तरुणवर्गदेखील कुठल्या न कुठल्या कारणाने याला बळी पडू शकतात. त्यामुळे असे ॲप्लिकेशन मुळातच वापरू नये किंवा वापरल्यास खबरदारी आवश्‍यक आहे. -तन्मय दीक्षित, सायबर फॉरेन्सिक तज्ञ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com