छत्तीसगडमध्ये चकमकीत 3 नक्षलवादी ठार

SPM
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

रायपूर (छत्तीसगड)- दंतेवाडा जिल्ह्यातील जंगलामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये एका महिला नक्षलवाद्याचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.

दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक कामलोछन कश्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्छेघाट परिसरात नक्षलवादी व जवानांनमध्ये आज सकाळी चकमक झाली. चकमकीत तीन नक्षलवादी जागीच ठार झाले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडील शस्त्रसाठी हस्तगत करण्यात आला आहे. परिसरात नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Chattisgad

टॅग्स