खेळता खेळता अचानक बालक गायब झाला; आणि समोर आली भयंकर घटना

ज्ञानेश्वर पाटील
Wednesday, 23 December 2020

आई ज्योतीने बांधार बसऊन शेतात निंदनी करण्यासाठी गेल्या. काही वेळाने आईला मुलगा काय करतोय पाहण्यासाठी गेली तर मयुर दिसला नाही.

अंतुर्ली ः भटाणे ता. अंतुर्ली ता.शिरपूर येथे शेत मजुरी करणाऱ्या आई सोबत शेतात गेलाला बालक. शेतात खेळत असतांना हा मुलगा अचानक गायब झाला. सर्वत्र शोध घेत असतांना काही अंतारावर मुलगा सापडला पण मृत अवस्थेत. 

आवश्य वाचा- दौंड-मनमाड दरम्यान मालगाडीचे डब्बे घसरले; चार रेल्वे गाड्या रद्द -

भटाणे येथील दिनेश शिवाजी ईशी व ज्योती दिनेश ठाकरे कुटुंब शेत मजुरी करतात. दोन मुले पैकी एक मुलगा आजी जवळ सोडून मोठा मुलगा मयूर दिनेश ईशी याला कोरोनामुळे शाळा बंद आहेत म्हणून घरी एकटे सोडण्या एवजी सोबत शेतात घेऊन जाने योग्य म्हणून मिरची निंदनीसाठी अंतुर्ली शिवारातील शेतात मजुरी साठी दोन दिवसा पासून मुलाला घेऊन जात होती.

मयुर बांधावर बसला गायब झाला 

मयुरला आई ज्योतीने बांधार बसऊन शेतात निंदनी करण्यासाठी गेल्या. काही वेळाने आईला मुलगा काय करतोय पाहण्यासाठी गेली तर मयुर दिसला नाही.

मयुर सापडला पण ?

 मयुर सापडत नसल्याने त्याची शेतात व आजूबाच्या परिसतील शेतात शोध सुरू झाला. जवळच्या शेतात मुलगा मयुर मृत अवस्थेत आढळून आला.

दगडाने ठेचून हत्या

मयुर याचा मृतदेह जवळच्या शेतात आढळला. पण मयुरचा हत्या अज्ञात ईसमाने तोंड ठेचून हत्या केल्याचे दिसून आले. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर पोलीस हवालदार श्री.ठाकरे,पोलीस नाईक अनिल कोळी ,पोलीस कॉन्सस्टेबल श्री.माळी घटना स्थळी येवून मृतदेह ताब्यात घेवून शवविश्चेदनासाठी रवाना केला.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: childs life hit marathi news bhatane dhule