Dhule News : रुग्णांनी फिरविली पाठ; अधिकाऱ्यांविना बिघडलंय निमगूळ आरोग्य केंद्राचं स्वास्थ्य..!

Health Center Building.
Health Center Building.esakal

Dhule News : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला घरघर लागली असून, वैद्यकीय सुविधा नसल्याने एकेकाळी जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने वैद्यकीय सुविधा मिळत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

मात्र सध्या याउलट स्थिती निर्माण झाल्याने रुग्णही या पाठ फिरवत आहेत. (Citizens demand for healthcare center repairing dhule news )

केंद्रात अधिकाऱ्यांसह ११ पदे रिक्त असून, ती भरून आरोग्यसेवा सुधारावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रुग्णांनी फिरविली पाठ

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्कालीन आरोग्याधिकारी हितेंद्र देशमुख यांची उल्लेखनीय कामगिरी होती. त्यांच्याकडे शिस्त असल्याने आरोग्य केंद्राचा कर्मचारी वर्ग वेळेवर हजर होत, तसेच परिसरातील पाच उपकेंद्रांसह १९ गावे जोडली असल्याने वैद्यकीय सुविधा योग्य प्रमाणात मिळत होती.

औषधांचा साठा वेळेवर उपलब्ध होत होता. सर्वसामान्य नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळत असलेली वागणूक, उपचार यावर समाधान मिळत असल्याने कार्यक्षेत्र नसलेल्या गावाचे रुग्णही प्राथमिक आरोग्य केंद्रात येत. त्यामुळे नेहमी यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांनीदेखील पाठ फिरविली आहे असून, दिवसभर येथे शुकशुकाट असतो.

Health Center Building.
Dhule News : शिरपूरला दीड शतकाची परंपरा असलेल्या वहनोत्सवाला आजपासून सुरवात

सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड

या प्राथमिक आरोग्य केंद्राची १२ ऑक्टोबरला रजिस्टरची माहिती घेतली असता रुग्णाची संख्या ३७ व मंजूर पदांची संख्या ३३ असा अजब प्रकार पाहावयास मिळाला. म्हणजे एके काळी दोनशेवर रुग्णसंख्या असताना सध्या जवळपास जेवढी मंजूर पदसंख्या आहे तेवढे रुग्ण अशी झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सलाइनवर असल्याचे चित्र आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ११ पदे रिक्त आहेत. या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असताना एकही वैद्यकीय अधिकारी नाही. वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. सर्वसामान्य जनतेला शासकीय सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. औषधनिर्माता हे पद अगोदर कायमस्वरूपी होते.

काही काळानंतर फक्त आठवड्यात तीन दिवस येत असल्याने तेही पद रिक्त जागेसारखे असल्याने आरोग्य विभागात कामचलाऊ कारभार चालत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील बाह्यरुग्ण तपासणीत प्रथम असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अशी स्थिती निर्माण झाल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष घालण्याची गरज असून, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रिक्त जागा भराव्यात. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.

Health Center Building.
Dhule News : खदाणीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

पदाचे नाव मंजूर पद भरलेली पदे रिक्त पदे

वैद्यकीय अधिकारी २ ० २

प्रयोगशाळा अधिकारी १ ० १

आरोग्य सहाय्यक पुरुष २ १ १

आरोग्यसेविका ६ ६ २

आरोग्यसेवक ५ ४ १

परिचर ४ २ २

स्विपर १ १ ०

औषधनिर्माण अधिकारी १ १ १

कनिष्ठ सहाय्यक १ १ ०

आरोग्य सहाय्यक स्त्री १ १ ०

कंत्राटी रिक्त पदे

आरोग्यसेविका ३ २ १

आरोग्य समुदाय अधिकारी ४ ४ ०

वाहनचालक १ १ ०

अधिपरिचारिका १ १ ०

''निमगूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने सर्वसामान्य जनतेचे समाधान होत नाही. आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी द्यावा.''-चंद्रकांत शिरसाठ, ग्रामस्थ

''प्राथमिक आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र पद रिक्त असून, जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा जनतेच्या हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.''-कल्याण बागल,शिवसेना जिल्हा उपसंघटक

Health Center Building.
Dhule News : सोनगीर ग्रामीण रुग्णालय 50 खाटांचे करणार : आमदार कुणाल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com