जळगाव- शहरातील विविध वस्त्यांमध्ये अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरिक आक्रमक होऊ लागले आहेत. गेल्या आठवड्यात आशाबाबा नगर, माऊलीनगरातील रहिवाशांनी आयुक्तांना घेराव घातल्यानंतर सोमवारी (ता.२४) भिकमचंद जैन नगर, दुर्वांकूर पार्क व परिसरातील नागरिकांनी महापालिकेवर धडक दिली.