esakal | मोदींच्या सभेपूर्वी गुलाबराव पाटील-महाजनांमध्ये खडाजंगी
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींच्या सभेपूर्वी गुलाबराव पाटील-महाजनांमध्ये खडाजंगी

भाजपची कारवाई शून्य
असे असताना भाजपने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, अशी शिवसेनेची तक्रार आहे. काल संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी याचे गंभीर परिणाम होतील, असे पत्र महाजनांना दिले. मात्र, त्याचीही अद्याप दखल घेतली गेली नाही.

मोदींच्या सभेपूर्वी गुलाबराव पाटील-महाजनांमध्ये खडाजंगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील काही मतदारसंघांमधील बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावरुन जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात आज मोदींच्या सभास्थळी जोरदार खटके उडाले. शिवसेना उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये बंडखोरांवर कारवाईची व्यथा मोदींसमोर मांडेल, असा गुलाबराव पाटलांनी पवित्रा घेतला. मात्र, महाजनांनी त्याला स्पष्ट नकार देत असे करता येणार नसल्याचे बजावले. त्यामुळे दोघांत चांगलीच खडाखडी झाली.

राज्यासह जळगाव जिल्ह्यातही भाजप-शिवसेनेतील बंडखोरांचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. जळगाव जिल्ह्यातील काही जागांवर, विशेषत: शिवसेना उमेदवार असलेल्या ठिकाणी भाजपच्या विद्यमान पदाधिकारी, नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी कायम ठेवली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांच्या जळगाव ग्रामीणमध्ये भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याचे पती चंद्रशेखर अत्तरदे रिंगणात आहेत. तर चोपड्यात खुद्द जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणेंनी सेनेच्या अधिकृत उमेदवार लता सोनवणे यांची अडचण केली आहे. पाचोरा येथे आमदार व सेना उमेदवार किशोर पाटलां विरोधात भाजपचे अमोल शिंदे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

भाजपची कारवाई शून्य
असे असताना भाजपने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, अशी शिवसेनेची तक्रार आहे. काल संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी याचे गंभीर परिणाम होतील, असे पत्र महाजनांना दिले. मात्र, त्याचीही अद्याप दखल घेतली गेली नाही.

पाटील- महाजनांमध्ये खडाजंगी
अशात रविवारी दुपारी पंतप्रधान मोदींची जळगावातील विमानतळासमोरील मैदानावर सभा होत आहे. या सभेत बंडखोरांवरील कारवाई टाळली जात असल्याची व्यथा मांडण्याची संधी मिळावी; म्हणून गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजनांकडे आग्रह धरला. मात्र, महाजनांनी तसे भाषण करता येणार नसल्याचे बजावले. त्यावर या सभास्थळीच पाटील- महाजनांमध्ये खडाखडी झाली. गुलाबराव पाटलांनी हा मुद्दा आपण मांडणारच, असा आग्रह धरला असून मोदी येण्याची प्रतीक्षा असताना दोघा मंत्र्यांमध्ये बंडखोरांच्या मुद्यावरुन रंगलेला वाद सभास्थळी चर्चेचा विषय ठरला. हा मुद्दा युतीच्या प्रवासातही मोठी अडचण ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

loading image
go to top