त्वचा साफ, चेहरा साफ, है विश्‍वास अपने पास!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

नाशिक - हिवाळा सुरू झाल्याने आता नाशिकमधील कॉस्मेटिक्‍सच्या दुकानांमध्ये महिलांची गर्दी होत आहे. थंडीत त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागत असल्याने कोल्ड क्रीम, मॉईश्‍चरायझर, लोशन खरेदीकडे महिलांचा कल आहे. थंडीत कोल्ड क्रीम महिलांची गरजच बनली आहे.

सौंदर्यप्रसाधनांच्या कोट्यवधींच्या उलाढालीत हिवाळ्यातील कोल्ड क्रीमचे प्रमाण सर्वांत जास्त असते.

हिवाळा आरोग्यदायी ऋतू मानला जातो. या दिवसांत आरोग्याच्या समस्यांचे प्रमाणही कमीच असते. त्यामुळे सर्वांना आवडणारा हा ऋतू आहे. आरोग्यदायी ऋतू असला, तरी थंड हवेमुळे त्वचा रुक्ष, कोरडी होते. रंगातही फरक पडतो व त्वचेच्या समस्यांमध्ये वाढ होऊ लागते. त्या तुलनेत उन्हाळा आणि पावसाळ्यात त्वचेची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. हिवाळ्यात त्वचेकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तरुणी, महिला त्वचा व ओठांची विशेष काळजी घेतात. यासाठी लीप बाम, कोल्ड क्रीम, मॉइश्‍चरायझर, बॉडी लोशन खरेदी करताना दिसत आहेत.

मॉइश्‍चरायझरमध्येही चेरी, हनी, आल्मंड, मिक्‍स फ्रूट, रोज, शिया बटर, ऍलोवेरा हे प्रकार उपलब्ध आहेत. वीस रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत क्रीमच्या किमती आहेत. ओठांची काळजी घेणारे लीप केअर विविध प्रकारांत उपलब्ध आहेत. त्याची किंमत वीस रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत आहे. किमती कितीही वाढल्या, तरी त्यांची मागणीही वाढली आहे.

काही दिवसांपूर्वी क्रीम, मॉइश्‍चरायझरला अजिबात मागणी नव्हती. मात्र, थंडी वाढल्याने सध्या कोल्ड क्रीम, मॉइश्‍चरायझर, लोशनला दुपटीने मागणी वाढली आहे. यात विविध प्रकार असून, कोको, शिया बटर, हनी आल्मंड प्रकारातील मॉइश्‍चरायझर आणि कोल्ड क्रीमला मोठी मागणी आहे.
- अमर मराठे, संचालक, न्यू पैंजण कॉस्मेटिक्‍स

Web Title: Clean skin, clean face