Video : नाथाभाऊंच्या भविष्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना केंद्रात पाठवायचे की राज्यात ठेवायचे हे पक्षश्रेष्ठी ठरवत असतात. आजही ते आमचे मोठे नेते आहेत आणि मार्गदर्शक आहेत. मी महाराष्ट्रात खूश आहे.

भुसावळ : नाथाभाऊ (एकनाथ खडसे) आमचे ज्येष्ठ नेते असून, आजही आमच्यासाठी ते मोठे नेते आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज भुसावळमध्ये पोहचली असून, त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, गिरीश महाजन आदी प्रमुख नेते उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, की एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना केंद्रात पाठवायचे की राज्यात ठेवायचे हे पक्षश्रेष्ठी ठरवत असतात. आजही ते आमचे मोठे नेते आहेत आणि मार्गदर्शक आहेत. मी महाराष्ट्रात खूश आहे. पण, पक्ष जे सांगतील ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis talked about BJP senior leader Eknath Khadse