जळगाव- आपल्या पालकमंत्रिपदाच्या कार्यकाळात पोलिस दलासाठी चारचाकी व दुचाकी वाहने, पोलिस ठाण्यांची उभारणी व तांत्रिक सुधारणा यावर सातत्याने भर दिला. केवळ वाहने देणे हा उद्देश नसून, पोलिसांना आधुनिक संसाधने, योग्य प्रशिक्षण व आवश्यक सुविधा मिळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पोलिसांची ताकद म्हणजे समाजाची सुरक्षा आहे. त्यामुळे जनतेने पोलिसांचा सन्मान करावा व त्यांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.