Nandurbar : तंबाखूची अवैध वाहतूक करणारा कंटेनर जप्त | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Container seized by police latest marathi news

Nandurbar : तंबाखूची अवैध वाहतूक करणारा कंटेनर जप्त

विसरवाडी (जि. नंदुरबार) : नंदुरबार पोलिस व अन्न औषध प्रशासन पोलिसांनी मोठी कारवाई करत ९ लाख ७२ हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त (Tobacco Seized) करण्यात आला.

ही कारवाई सोमवारी (ता.१८) विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील व अन्न औषध प्रशासन अधिकारी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा कोंडाईबारी घाटात ही कारवाई करण्यात आली. (Container of illegal transport of tobacco seized Nandurbar Latest Marathi News)

हेही वाचा: नाशिक रोड भागात उद्या पाणीपुरवठा बंद

याप्रकरणी संशयित किशोर गुलाब बुवाडे (वय ४० रा. हिवरा वासुदेव ता. मुखेड जि. छिंदवाडा( मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विसरवाडी गावाकडून कोंडाईबारी घाटाकडे येणारा कंटेनर (एमएच ४० सीडी-७८९६) कंटेनर जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा: वडगाव सिन्नर येथे देवनदी पात्रात बिबट्याचा मृतदेह

Web Title: Container Of Illegal Transport Of Tobacco Seized Nandurbar Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandurbartobaccoTransport
go to top