Dhule : नशेसाठी वापरातील औषधे जप्त; 355 बाटल्या एलसीबीकडून ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police with siezed stock

Dhule : नशेसाठी वापरातील औषधे जप्त; 355 बाटल्या एलसीबीकडून ताब्यात

धुळे : खोकल्यासाठी उपयुक्त, मात्र नशेसाठी, गुंगीसाठी वापरात आणल्या जाणाऱ्या कोरेक्स (Corex) या औषधाच्या ३५५ बाटल्या एलसीबीच्या (LCB) पथकाने जप्त केल्या. सुरतहून या औषधाची नशेबाजांसाठी (Intoxificaton) आवक केली जात असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी एलसीबीने एका संशयितास ताब्यात घेतले, तर दुसरा पसार झाला. (corex cough syrup 355 bottles seized from LCB Dhule Crime News)

शहरातील गजानन कॉलनी परिसरात सुरतहून नशा, गुंगीचे औषध विक्रीसाठी आणले होते. याविषयी माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने छापा टाकत एकाला मंगळवारी ताब्यात घेतले. कारवाईत सुमारे ३५५ बाटल्या जप्त केल्या. पूर्व हुडको परिसरातील गरीब नवाज नगरात राहणारा शाहरूख शेख मुनाफ याने गुंगीचे औषध नशेसाठी विक्रीला आणले होते. नंतर पथकाने गजानन कॉलनीतून शाहरुखला ताब्यात घेतले. सुरतहून औषध आणल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ४९ हजार ७०० रुपयांच्या ३५५ बाटल्या सापडल्या. याशिवाय मोटारसायकलसह एकूण ८९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोरेक्स नामक औषध दिले जात नाही. शिवाय ते नशेसाठी वापरले जात असल्याने विक्रेते हे औषध विक्रीस ठेवणे टाळतात.

त्यामुळे ते मध्य प्रदेश, गुजरातहून मागविण्याचा नशेबाजांकडून प्रयत्न असतो. ही कारवाई एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, कर्मचारी संजय पाटील, संदीप सरग, प्रकाश पाटील, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, सागर शिर्के, मोहन माळी, कैलास महाजन यांच्या पथकाने केली.

टॅग्स :DhulecrimeDhule lcb