
आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वःताची काळजी घ्यावी.
नंदुरबार ः माजी मंत्री तथा भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijay kumar Gavit) व खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित (Dr. Heene Gavit) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खासदार डॉ. हिना गावीत यांनी याबाबत फेसबुक पोस्ट शेअर करून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.
आवश्य वाचा- पोलिसांना सांगतो का, आता घे म्हणत चेहऱ्यावर 'सपासप' केले वार
कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर आमदार डॉ. विजयकुमार गावित हे शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. खासदार डाॅ. हिना गावीत याबाबत फेसबुक पोस्ट शेअर करून 'आज माझी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह' आली आहे. मी होम क्वारंटाइन झाली आहे. आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वःताची काळजी घ्यावी असे अवाहन फेसबुक पोस्ट द्वारे केले आहे.
भेटायला कोणी येवू नये
खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. गावित यांना रुग्णालयात किंवा निवासस्थानी कार्यकर्त्यांनी वा कुणीही भेटण्यासाठी येऊ नये, असे आवाहन नंदुरबार भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे