जळगाव: पांढरे सोने म्हणून जिल्ह्यात कपाशीचे उत्पादन घेतले जाते. गेल्या सात-आठ वर्षांत साडेपाच ते सहा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात कपाशी वाणाची लागवड होती. परंतु, सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसह कापसाला दर कमी असल्याने यंदा शेतकऱ्यांनी मका वाणाची विक्रमी लागवड करीत कपाशी वाणाकडे पाठ फिरविली आहे. यंदा केवळ साडेचार लाख हेक्टरवर कपाशी वाणाची लागवड पाहता एक लाखापेक्षा अधिक हेक्टरची घट असल्याचे दिसून येत आहे.