जळगाव- खानदेशात कापूस दरात पुन्हा चढ-उतार सुरू झाले आहेत. यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. कापसाची आवक कमी असतानाही दर ७२०० रुपयांपुढे गेलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. कापसाची आवक अल्प असतानाही कापूस दर अस्थिर होते. पण मागील पाच ते सात दिवसांत कापूस दर काहीसे वाढले.