होती गाय म्हणून वाचली माय..

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

जमिनीत असणारा विद्युत पाईप उघडा पडला  व त्याचा विद्युत प्रवाह जमीन व पाण्यात उतरल्याने गायीचा मृत्यु झाला. त्याच वेळी एक बाई तिथून चालली होती, परंतु गाईला शॉक लागल्याचे कळताच ती सावध झाली आणि त्या बाईचे प्राण वाचले. गाईच्या मृत्यु झाला म्हणून येथील लोकांना विद्युत प्रवाह उतरल्याचे कळाले, अन्यथा एखादी व्यक्तीला प्राण गमवावे लगले असते. अशी चर्चा होऊ लागली.

नाशिक : मागील काही दिवसापासून सिडको व अंबड परिसरात विजेचा धक्का लागून माणसं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत असतांना आता मुक्या जनावरांना जीव गमावण्याच्या दुर्दैवी घटना घडत असल्याने नागरिक व प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.अंबड परिसरामध्ये वीज प्रवाहाच्या धक्क्याने गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.
 विजेच्या धक्क्याने मागील दोन महिन्यांमध्ये सिडको परिसरामध्ये तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले असून यावेळी तर मुक्या जनावरांना देखील आपले प्राण गमवावे लागले आहे.

यामुळे मोठा अनर्थ टळला

गाईचा विजेचा प्रवाह लागून मृत्यू झाल्याची घटना अंबड परिसरातील दत्तनगर चेन्नई येथील सम्राट कॉलनी येथे घडली असून या ठिकाणी एका महिलेलाही विजेच्या प्रवाहाचा धक्का लागला आहे. परंतु महिलेने पायामध्ये चप्पल घातली असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यावेळी घटनास्थळी नगरसेवक राकेश दोंदे यांनी धाव घेऊन वीजपुरवठा बंद करण्याच्या सूचना महावितरण ला दिला व परिस्थितीची पाहिनी केली तसेच संतोष दोंदे, बाळा दोंदे, भास्कर दोंदे आदींसह नागरिक मोठ्याप्रमाणात मदतीसाठी धाऊन आले.घटनेनंतर महावितरणचे अभियंता श्री वानखेडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बाईचा मृत्यु गायीने घेतला आपल्या अंगावर 
जमिनीत असणारा विद्युत पाईप उघडा पडला  व त्याचा विद्युत प्रवाह जमीन व पाण्यात उतरल्याने गायीचा मृत्यु झाला. त्याच वेळी एक बाई येथून चालली होती, परंतू गाईला शॉक लागल्याचे कळताच ती सावध झाली आणि त्या बाईचे प्राण वाचले. गाईच्या म्रुत्यु झाला म्हणून येथील लोकांना विद्युत प्रवाह उतरल्याचे कळाले, अन्यथा एखादी व्यक्तीला प्राण गमवावे लगले असते अशी चर्चा एकला मिळाली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The cow died after lightning struck