Dhule Crime News : कपाशीआडून होणारी गोतस्करी रोखली

ट्रकमधून कपाशीआडून निदर्यपणे होणारी गोतस्करी धुळ्यासह नंदुरबार, साक्रीच्या गोरक्षकांनी रोखली.
Cow guards and colleagues
Cow guards and colleagues esakal
Updated on

Dhule Crime News : ट्रकमधून कपाशीआडून निदर्यपणे होणारी गोतस्करी धुळ्यासह नंदुरबार, साक्रीच्या गोरक्षकांनी रोखली. थेट नवापूर (जि. नंदुरबार)पासून पाठलाग करीत धुळे शहरातील गणपती पुलाजवळ ट्रक रोखत त्यातील १६ गायींना जीवदान दिले.

वाहनात चार गायी मृत आढळल्या. ट्रकसह जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली. (Cow guards of Nandurbar Sakri stopped illegal cow transport from the truck along with dhule crime news)

मालेगाव (जि. नाशिक) येथील एका तस्कराकडून कपाशीच्या गोण्यांआड गेल्या आठ दिवसांपासून गुरांची तस्करी सुरू होती. तो पोलिसांसह गोरक्षकांना चकवा देत होता.

मंगळवारी (ता. २३) ट्रक (एमएच ०४, एफएस ७७४४)मधून गायींची तस्करी होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानुसार त्यांनी थेट नवापूरपासून ट्रकचा पाठलाग केला.

त्यादरम्यान ट्रकचालकाने धुळ्यापर्यंत सहा वेळा यूटर्न घेत चकवा देण्याचा प्रयत्न केला. धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी ट्रकचालकाने धावत्या गाडीतून उडी मारली.

Cow guards and colleagues
Dhule Crime News : रिक्षासह लाखाची गुंगीची औषधे जप्त

यादरम्यान एका गोरक्षकाने प्रसंगावधान राखत गाडीचे स्टेअरिंग हाती घेत वाहन बाजूला थांबवीत अपघातापासून वाचविले.

नंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता कपाशीच्या गोण्यांआड २० गायींना निदर्यपणे कोंबलेले आढळले. त्यातील १६ गायींची सुटका केली. चार गायी मृतावस्थेत आढळल्या.

गायींना खानदेश गोशाळेत पाठविण्यात आले. गोरक्षक प्रवीण मंडलिक, सागर नायक, रवींद्र पाटील, शुभम सूर्यवंशी यांच्यासह साक्री व नंदुरबारच्या गोरक्षकांसह अनेकांनी याकामी सहकार्य केले.

Cow guards and colleagues
Navi Mumbai Crime: ३ किलो ८० ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेवून मालक झाला फरार; वाचा संपूर्ण बातमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com