Nandurbar News : वडाळी येथे पकडला गोवंशाचा ट्रक; गोरक्षकांकडून चोप

Cattle herded in trucks for slaughter.
Cattle herded in trucks for slaughter. esakal

वडाळी (जि. नंदुरबार) : कत्तलीसाठी ट्रकमधून ३० गोवंशाची वाहतूक करणाऱ्यास वडाळी (ता. शहादा) येथील गोरक्षकांनी पकडून चालक व सहचालकाला चांगलाच चोप देत धडा शिकविला.

संबंधित व्यक्तींना ट्रकसह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. (Cow vigilantes from Wadali caught a man who was transporting 30 cow in truck for slaughter nandurbar news)

शहाद्याहून सोमवारी (ता. १३) सकाळी सातच्या सुमारास भरधाव येणाऱ्या ट्रक (जीजे ०८, झेड ६५३२)मध्ये गोवंश भरून शिरपूरमार्गे मालेगावच्या दिशेने जात असल्याची माहिती शहादा येथील गोरक्षकांना मिळाली. त्यांनी वाहनास वडाळी येथे थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रक सोडून पसार होण्याचा प्रयत्न केला आणि तो ट्रक निंबाच्या झाडावर आदळला.

यात ट्रकचालक शेख खाज्या शेख चांद (वय २४) व सहचालक रिजवान खान इस्माईल खान (३३, दोघे रा. देविका मल्ला, मालेगाव) यांना पकडून त्यांच्या ताब्यातील गायी व बैल अशा ३० लहान-मोठ्या गोवंशाची सुटका करण्यात आली. उर्वरित गोवंशाला चौपाळे (ता. नंदुरबार) येथील गोशाळेत पाठविण्यात आले असून, दोन गोवंशाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Cattle herded in trucks for slaughter.
Unique Tradition : "जावयाची गाढवावरून धिंड" प्रथा मोडीत; ना मिळाले गाढव अन् ना मिळाला जावई !!!

जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १३ लाख ४६ हजर रुपये असून, ट्रकचालक शेख खाज्या शेख चांद व सहचालक रिजवान खान इस्माईल खान यांना सारंगखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगवान कोळी, सहाय्यक फौजदार प्रमोद वळवी, पोलिस नाईक शहाणाभाऊ ठाकरे, मधुकर ठाकरे, होमगार्ड मनोज माळी, घनश्याम सोनवणे, किसन ठाकरे, अनिल सोनवणे, विजय गिरासे, बलदेव गिरासे घटनास्थळी उपस्थित होते. ललित जगताप यांच्या फिर्यादिवरुन या घटनेचा तपास उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.

Cattle herded in trucks for slaughter.
Nandurbar Crime News : 39 वर्षांपासून फरारी आरोपीस अटक; नवापूर पोलिसांची कामगिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com