Dhule Crime News : क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारी टोळी ताब्यात

शहरातील अग्रसेन पुतळ्यासमोरील हॉटेलमधील रूम नंबर ११२ मधून एक जण ऑनलाइनच्या माध्यमातून क्रिकेटवर सट्टा लावत असल्याची असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली.
crime
crime esakal

Dhule Crime News : क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून याप्रकरणी कोकणातील एका संशयितास धुळ्यातील हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच संशयितांसह १२ जणांविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Cricket match betting gang arrested by police dhule crime news)

शहरातील अग्रसेन पुतळ्यासमोरील हॉटेलमधील रूम नंबर ११२ मधून एक जण ऑनलाइनच्या माध्यमातून क्रिकेटवर सट्टा लावत असल्याची असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. या आधारे त्यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना कारवाईचे आदेश दिले.

पोलिस अधिक्षकांच्या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने संबंधित हॉटेलच्या रुम नंबर ११२ मध्ये छापा टाकला. भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या एकदिवस क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनद्वारे क्रिकेट बेटिंग अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून सट्टा खेळला जात होता.

crime
Dhule Crime News: हाडाखेडजवळ 33 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

एलसीबीच्या छाप्यात नीलेश रामप्रसाद राव (वय २७, रा. रायगड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दोन मोबाईलमध्ये ‘ऑल पॅनल’ नावाच्या बेटिंग अ‍ॅपद्वारे तो भारत-दक्षिणअफ्रिका यांच्यात खेळला जात असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावत असल्याचे त्याने कबूल केले. उल्हासनगर येथील साथीदारांच्या मदतीने हा सट्टा सुरु असल्याचे नीलेशने सांगितले.

या माहितीच्या आधारे नीलेश राव याच्यासह त्याच्या बारा साथीदारांविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात हवालदार प्रशांत चौधरी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे, सहायक निरीक्षक गणेश फड, उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार प्रशांत चौधरी, शशिकांत देवरे, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

crime
Dhule Crime News : शिरपूर-हाडाखेडजवळ मद्यसाठा जप्त; महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी कारवाई

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com