
मध्यरात्री उशिरा पावरा पुन्हा कार्यालयात येत पाच हजार रुपयांची मागणी केली. देशमुख यांनी त्याला निघून जाण्यास सांगितले असता याचा राग आला.
शिरपूर : सरंपचाने ३१ डिसेंबरच्या रात्री ओली पार्टी करण्यासाठी कर्तव्य बजावित असणारे आरटीओलाच पैशांची मागणी करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हाडाखेड गावाच्या सरंपचाने हा प्रताप केला असल्याचे समोर आले आहे. याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाख केला आहे.
आवश्य वाचा- पळून जाऊन साता जन्माच्या बांधल्या रेशीमगाठी; प्रेम विवाहनंतर चार दिवसात घडले भयंकर !
हाडाखेड (ता. शिरपूर) येथील सीमा तपासणी नाक्यावरील मोटार वाहन निरीक्षक महेश देशमुख हे सहकारी अधिकारी पद्माकर पाटील यांच्यासह ३१ डिसेंबरला रात्री कर्तव्यावर होते. रात्री उशिरा संशयित सूरज अत्तरसिंह पावरा (रा. हाडाखेड) त्यांच्या कार्यालयात गेला. मी सरपंच आहे. ३१ डिसेंबरला मला पार्टी करायची आहे म्हणून पाच हजार रुपये द्या अशी मागणी त्याने केली. देशमुख यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे तुम्हांला पाहून घेईन, अशी धमकी देऊन तो निघून गेला.
पून्हा आला आणि केली मारहाण
मध्यरात्री उशिरा पावरा पुन्हा कार्यालयात येत पाच हजार रुपयांची मागणी केली. देशमुख यांनी त्याला निघून जाण्यास सांगितले असता याचा राग आल्याने सूरज पावरा याने त्यांची देशमुख यांची कॉलर पकडून मारहाण केली व शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
वाचा- ग्रामपंचायत निवडणूक: जिल्हयात १९ हजार ९८३ अर्ज वैध
पोलिसात गुन्हा दाखल
मोटार वाहन निरीक्षकाला मारहाण करणाऱ्याविरोधात सूरज अत्तरसिंह पावरा या संशयिताविरोधात शासकीय कामकाजात अडथळा व मारहाण केल्याबद्दल सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संपादन- भूषण श्रीखंडे