Crime News : अमेरिकन डॉलरच्या आमिषाने तेल व्यापाऱ्याला चुना; दोघे रफूचक्कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money Fraud

Crime News : अमेरिकन डॉलरच्या आमिषाने तेल व्यापाऱ्याला चुना; दोघे रफूचक्कर

नंदुरबार : ‘अमेरिकन डॉलर देतो, तुम्ही आम्हाला भारतीय चलन द्या,’ असे सांगत येथील तेल व्यापाऱ्याला नकली डॉलर देऊन ४० हजारांची फसवणूक करीत दोघे अनोळखी रफूचक्कर झाले. ही बाब लक्षात येताच संबंधित व्यापाऱ्याने पोलिसांत फिर्याद दिली.

हेही वाचा: Eknath Shinde: मुहूर्त ठरला! शिंदे गट पुन्हा जाणार गुवाहाटीला

शहरातील आदर्शनगरमध्ये शनैश्‍वर ट्रेडिंग कंपनीचेमालक राजल मोहनदास सेवलाणी शनिवारी (ता. १९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या दुकानात बसले होते. या वेळी दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यात एकाने नेव्ही ब्लू रंगाचा शर्ट व थ्री फोर खाकी रंगाची पॅन्ट, तर दुसऱ्याच्या डोक्यात नारिंगी रंगाची टोपी घातले होती. त्यांनी सेवलानी यांना ‘आमच्याकडे विदेशी चलन (अमेरिकन डॉलर) आहे. ते घेता का,’ असे विचारणा केली. त्या आमिषाला बळी पडत सेवलानी यांनी त्यांना होकार दिला.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

त्यानुसार ती रक्कम ४० हजारांची असल्याची बतावणी करीत सेवलानी यांच्याकडून दोघा भामट्यांनी पाचशेच्या ८० नोटा म्हणजे ४० हजार रुपये घेत तेथून रफ्पूचक्कर झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाव्याचे सेवलानी यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ उपनगर पोलिस ठाणे गाठत तेथे घडलेली हकीगत सांगितली व फिर्याद दिली. या प्रकरणी दोघा भामट्यांविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: Relationship Tips : मुलांच्या या सवयींवर भाळतात मुली; लगेच पडतात प्रेमात