जळगाव- दापोरा (ता. जळगाव) गावात रात्रीच्या वेळी गच्चीवर झोपलेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केला. त्याचा जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेले असता त्याने मुलीच्या कुटुंबीयांवर जबर हल्ला केला. तर एका नातेवाईकाच्या पोटात चाकू खुपसल्याने व खांद्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.