जळगाव- यावल तालुक्यातील तरुणीचा नशिराबाद येथील रिक्षाचालकासोबत प्रेमविवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले असून, गेल्या तीन दिवसांपासून पती-पत्नीत वाद सुरू होते. भांडणानंतर पती घरातून निघून गेला. त्यानंतर पत्नीने विषारी द्रव प्राशन केले. गल्लीतील ग्रामस्थांना कळाल्यावर त्यांनी रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान या विवाहितेचा मृत्यू ओढवला. सारिका डिगंबर वाघुळदे (वय ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.