
Nandurbar News : हरणखुरी गावात डुकरांची हौदास; पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
सिसा (जि.नंदुरबार) : शहरातील उकिरडे, गटारी कमी झाल्याने डुकरांनी धडगाव शहर सोडून थेट गावाकडे वाट धरल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.शहरातील डुकरे खायचे कमी पण नुकसान मोठ्या प्रमाणात करीत आहेत.
अशी त्यांची खाद्यशैली असल्याने हरणखुरी गावातील शेतकरी त्रस्त झाले असून, हिवाळी पिकांची राखण करायला रात्रभर जागरण करावे लागत असून, गावातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी केली आहे. (Hocrop damage of pigs in Harankhuri village Heavy loss of crops Nandurbar News)
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
धडगाव शहरापासून अवघ्या तीन किलोमीटरवर हरणखुरी गाव असल्याने डुकरांच्या नुकसानीला सर्वांत जास्त शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत वन खात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला तर गावठी डुकरांनी केलेल्या नुकसानीला भरपाई देण्याची तरतूद वन खात्याकडे नाही.
मात्र रानडुकरांनी नुकसान केले तर भरपाई मिळते, अशी माहिती दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे मदत मागावी, असा प्रश्न पडला आहे.तालुका प्रशासनाने व धडगाव नगरपंचायतीने डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी हरणखुरी ग्रामस्थ करत आहेत.